❒ Friday | 28 January 2021 | Panvel

☰ पनवेल — दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या किसान आंदोलन ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली दिल्ली मध्ये झालेला आंदोलकांचा उद्रेक व त्यानंतर लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकवून राष्ट्रध्वजाचा करण्यात आलेल्या अपमानाबद्दल संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी भारत रक्षा मंचच्या वतीने दि. 29 रोजी कोंकण आयुक्ता द्वारे केन्द्रीय गृहमंत्रालयाकडे करण्यात आली आहे.

महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा बिना गोगरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाच्या नावाखाली पोलीस व सैन्य बळावर हल्ला कारण्यात आला तसेच देशाच्या संपत्तीचे देखील मोठे नुकसान करण्यात आल्याने हे कृत्य घृणास्पद असल्याने संबंधित आंदोलकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा बिना गोगरी यांच्यासह पंकज तिवारी, मयुरेश शेट्ये, सर्वेश्वर शर्मा, सुभाष सिंह, जयेश गोगरी, अल्पना डे, चित्रा राव, नीता गोगरी आदि उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आतंकवादी संघटनेने हे कृत्य केले असल्याचे सांगत संबधीतांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे सांगत बिना गोगरी यांनी हे निवेदन कोंकण आयुक्तांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना दिले.

❒ © Copyright JD News Media

DISCLAIMER: The author is solely responsible for the views expressed in this article. The author carries the responsibility for citing and/or licensing of images utilized within the text.