आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू. Shri Devendra Fadnavis

✍? : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईतील कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात काही लक्षवेधी विधाने केली. भाषणं तर अनेक लोक करतात, अनेकांना ती कला चांगली अवगतही आहे. पण मैदानात संघर्षाची वेळ आल्यानंतर घरात लपून बसणारे, मैदानातून पळ काढणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत. ‘आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये’, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य करणे हेच आमचं यश आहे. पण केवळ विदर्भाचं रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या नेत्यांच्या दिशेने होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ते गुरुवारी प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना संकटाची हाताळणी, मेट्रो कारशेड आणि अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. काही लोकांच्या इगोमुळे पुढची चार वर्षे मेट्रो सेवा सुरु होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

❒ ‘धारावी पॅटर्न’वरुन मुख्यमंत्र्यांना टोला?

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असताना आणि लोकं मृत्यमुखी पडत असताना काही लोकं वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

#भाजपा #सोशलमिडिया #वृत्तसेवा #BJP #Maharashtra #महाराष्ट्र

DISCLAIMER: The author is solely responsible for the views expressed in this article. The author carries the responsibility for citing and/or licensing of images utilized within the text.